पर्यावरण आणि पर्यटन (महाराष्ट्र) – May 2026

आगरझरी गाव आता 'फुलपाखरांचे गाव'

चंद्रपूर जिल्ह्यातील आगरझरी गाव आता 'फुलपाखरांचे गाव' (Butterfly Village) म्हणून विकसित केले जाणार आहे.

प्रमुख मुद्दे :

या उपक्रमाची विशेष वैशिष्ट्ये :

भारतभरातील पहिल्या 'महिला बटरफ्लाय गाईड' : ताडोबा प्रशासनाने या गावातील तीन महिलांची 'भारताच्या पहिल्या महिला बटरफ्लाय गाईड' म्हणून निवड केली आहे. त्यांना फुलपाखरांचे जीवनचक्र आणि पोषक वनस्पतींचे विशेष प्रशिक्षण दिले जात आहे.
अनोखी नामकरण योजना : गावातील प्रत्येक घराला एका विशिष्ट फुलपाखराच्या प्रजातीचे नाव दिले जाणार आहे. संबंधित कुटुंब त्या फुलपाखराशी संबंधित वनस्पतींचे संवर्धन करेल.
'फुलपाखरु - गोंडी कला' प्रशिक्षण : गावात या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली असून, पारंपरिक कलेच्या सहाय्याने स्थानिक युवक आणि महिलांना रोजगाराशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.